मुंबई, दि. ३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोकणातील रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सध्या रस्ता दुभाजक, उड्डाणपूल, साईड पट्टी इत्यादी कामे सुरू असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीसाठी अपेक्षित सोयी सुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे होणारी टोल आकारणी बंद व्हावी या कोकणवासीयांच्या भावनेचा आदर करत हा टोल स्थगित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
भविष्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांना टोलमध्ये सवलत देण्याबाबतही विचार व्हावा, अशी विनंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ
















WhatsApp