मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
- Advertisement -


मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मुंबई, दि. १६ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै, 2026 रोजी स. 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

179-सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात समाज मंदिर हॉल, सरदार नगर नं. 1, महानगरपालिका शाळेसमोर, सायन (पू), मुंबई-400 022 येथे, 181-माहिम विधानसभा मतदार संघासाठी रविंद्र नाट्य मंदिर, सिध्दिविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025 येथे तर 185-मलबार हिल विधानसभा मतदारसंघात शारदा मंदिर हायस्कूल, तळमजला, शारदा मंदिर हॉल, शिवतापी बिल्डींगजवळ, जे.के. टॉवर च्या समोर, गोरेगावकर मार्ग, गावदेवी, मुंबई-400 007 येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये
22 जुलै, 2026 ते 2 ऑगस्ट, 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याबाबत शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांसोबतच केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे विविध विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील विविध योजनांचा लाभ तसेच सेवा हमी कायद्यानुसार द्यायच्या सेवा (जसे विविध दाखले, नवमतदारांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुदान, शिधापत्रिकेसंबंधित सेवा, मत्स्य ‍विभागाकडील विविध सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, क्रीडा विभागाकडील योजना इ.चा) लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी या योजनांचा तसेच सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

००००



Source link

- Advertisement -