मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी – महासंवाद

    - Advertisement -

    पुणे, दि. १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ तसेच श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्ट येथील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

    यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नबीन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासणे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासणे, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजविण्याचा घेतला आनंद, श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक ढोल-ताशा गजरात पथकाने स्वागत केले. यावेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरू काठी घेत स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

    0000

     

    - Advertisement -