
मुंबई, दि. ७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ठाणे-कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथील इमारत क्रमांक ए-५०, पहिला मजला, कल्याण जिल्हा ठाणे ४२१३०१ येथे मोफत मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृह योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत निवासासह भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) यामधील इयत्ता १२वी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahit.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१. यांनी केले आहे.
००००
अश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp