महिलांच्या जीवनप्रवासातील संघर्षाचे छायाचित्र प्रदर्शनातून प्रभावी चित्रण – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३० : मुलीच्या जन्मापासून ते महिलेच्या आयुष्यातील विविध टप्प्यांपर्यंत तिला करावा लागणारा संघर्ष, तिचा जीवनप्रवास आणि समाजातील वास्तव यांचे प्रभावी चित्रण उजेडाच्या वाटेवर छायाचित्र प्रदर्शनातून करण्यात आले आहे. मुली आणि महिलांना समाजात समान हक्क व समान संधी मिळण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्वपूर्ण असल्याचे मत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

    महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित ‘उजेडाच्या वाटेवर’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेट दिली. ही छायाचित्रे प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी टिपली आहेत. महिलांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थितीचे दर्शन या छायाचित्रांच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे.

    000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

     

    - Advertisement -