बांधिलकी:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस   – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर,दि.१ (जिमाका): राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आज हा मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.

    मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या प्रसंगी श्री. बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.

    या प्रसंगी इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आ.सुहास शिरसाट, आ.अनुराधाताई चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खा.डॉ.भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.

    ००००

    - Advertisement -