
रायगड-अलिबाग,दि.६ : पालकमंत्री वनराई बंधारा योजनेतील तुर्भे बुद्रुक, वझरवाडी कलमवाडी आणि भोगाव बुद्रुक येथील वनराई बंधाऱ्यांची राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे आदि उपस्थित होते.
पोलादपूर पंचायत समितीमार्फत 42 ग्रामपंचायतींपैकी आडावळे बुद्रुक 1, बोरज 4, बोरघर 1, बोरावळे 3, भोगाव खुर्द 3, चांभारगणी बुद्रुक 1, दिविल 3, देवळे 6, देवपूर 3, धारवली 5, गोळेगणी 1, कापडे बुद्रुक 2, कापडे खुर्द 2, काटेतळी 5, कालवली 3, कोतवाल बुद्रुक 1, कोतवाल खुर्द 1, कुडपण बुद्रुक 2, कोंढवी 2, लोहारे 2, महाळुंगे 1, मोरसडे 3, ओंबळी 1, परसुले 2, पार्ले 1, पळचिल 1, पैठण 1, सडवली 2, सवाद 1, तुर्भे बुद्रु 2, तुर्भे खोंडा 2, वाकण 2, वझरवाडी 3 असे एकूण 76 वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.
भोगाव खुर्द येथे केंद्रीय पाणलोट कार्यक्रमांतर्गत सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढून पाणी अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असल्याने तेथे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात माजी सरपंच राकेश उतेकर, दगडू पार्टे तसेच अन्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दौऱ्यात कलमवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ उतेकर, जि.प.सदस्य डॉ. निलेश कुंभार, पं.स. समिती उपसभापती अनिता भिलारे, पं.स. सदस्य अनिल दळवी व साक्षी कांबळेकर, महाड उपविभागीय अधिकारी डॉ. पोपट ओमासे, पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, पं.स. कृषी अधिकारी अरुण धीवरे, पं.स. शाखा अभियंता कांबळे आदींसह तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उद्योजक रामदास कळंबे, अनिल भिलारे, अनिल पवार, वझरवाडीचे सरपंच संभाजी जाधव, भोगाव सरपंच सौ. पार्टे, तुर्भे खुर्द सरपंच गोविंद उतेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
00000

WhatsApp