शासनाने दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड ! – महासंवाद

    - Advertisement -

    हिंगोली, दि. ७ (जिमाका) : यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या दिवाळी अग्रीम मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचे आश्वासन शासनाने पूर्ण केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असून, मौजे बासंबा येथील लाभार्थी महिला नंदा श्याम पाटणकर यांनी शासनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

    नंदा श्याम पाटणकर

    यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने फार्मर आयडी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अग्रीम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाडीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
    “शासनाने दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. आर्थिक अडचणीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे मोठा आधार मिळाला,” अशा भावना नंदा श्याम पाटणकर यांनी व्यक्त करून शासनाचे आभार मानले.

    00000

    - Advertisement -