संविधान दिनानिमित्त मंत्रालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन – महासंवाद

    - Advertisement -




    मुंबई, दि. २६ : संविधान दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, सुनील जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    मंत्रालयातील संविधान मंदिरात पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    ००००

    प्रविण भुरके/स.सं.







    - Advertisement -