संविधान दिन : राज्यपालांकडून राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन – महासंवाद

    - Advertisement -




    मुंबई, दि. २६ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी संविधान दिनानिमित्त लोकभवन येथे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सर्व उपस्थितांसह वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती व सन २०२५ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकारी यांनी राज्यपालांसमवेत प्रास्ताविकेचे वाचन केले. लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी उपस्थित होते.

    भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

    ooo







    - Advertisement -