उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली चवदार तळ्याच्या विकासकामांची पाहणी – महासंवाद

    - Advertisement -




    रायगड-अलिबाग, दि. २६ : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

    यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी संविधानातील उद्देशिकेचे शपथपूर्वक सामूहिक वाचनही करण्यात आले.







    - Advertisement -