दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- Advertisement -


मुंबई, दि. २२: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिव्यांग २०२५/प्र.क्र.१७/१३७६८६४/कार्यासन-६ दि.१८ डिसेंबर, २०२५ अन्वये दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास पोत्साहन देण्याच्या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करणेसाठी १. विवाह नोंदणी दाखला २. वर व वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले ३. वर अथवा वधू यांचे (UDID) दिव्यांगत्व प्रमाणपत्र ४. वर व वधू यांचे एकत्रित फोटो (लग्नामधील फोटो) ६. वर व वधूचे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (Domicile) प्रमाणपत्र. ७. वर व वधूचे पोस्ट ऑफिसमधील संयुक्त खाते पासबुक छायाकिंत प्रत. ८. वर व वधूचे राष्ट्रियकृत बँकेचे संयुक्त खाते पासबुक छायाकिंत प्रत आवश्यक असून याकरिता दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा.

योजनेचा अर्ज वरिल कार्यालयात उपलब्ध होईल, असे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

0000

 

 



Source link

- Advertisement -