Home बातम्या काळजी घ्या ! मुंबईसाठी धोक्याची घंटा, रुग्णांची संख्या 433 वर

काळजी घ्या ! मुंबईसाठी धोक्याची घंटा, रुग्णांची संख्या 433 वर

मुंबई : मुंबईत आज तब्बल 103 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 433 वर पोहचला आहे. तर या आजाराने मुंबईत आज 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने गेल्या 24 तासात मुंबईत मोठे थैमान घातल्याचे दिसून येत आहे. दर तासाला रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुंबईसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.