करारी अभिनेता आपण गमावला! – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ८ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे.

    आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे.

    नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    ००००

    - Advertisement -