कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक म्हणून अधिसूचित

कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक म्हणून अधिसूचित
- Advertisement -


मुंबई, दि. १४ : केंद्र शासनाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ७९ए अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (डीएफएसएल) यांना इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक (Examiner of Electronic Evidence) म्हणून अधिसूचित केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हंस भुगरा मार्ग, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथील डीएफएसएलचे कार्यक्षेत्र संगणक (मीडिया) न्यायवैद्यक तसेच मोबाईल उपकरण न्यायवैद्यक असेल. ही अधिसूचना भारताच्या राजपत्रात (Gazette of India) दि. १३ जुलै २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.

0000

 



Source link

- Advertisement -