पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत २६ ऑगस्टला ‘दृकश्राव्य माध्यम करिअर मेळावा

- Advertisement -


मुंबई, दि. २४ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या प्रभादेवी येथील अकादमी संकुलात राज्य गणेशोत्सवाचे औचित्य साधून बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अकादमी संकुलात “दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमांचा मार्गदर्शनपर मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. दृकश्राव्य माध्यमातील ११ व्यावसायिक अल्पमुदतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या पहिल्या तुकडीचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. अतिशय माफक शुल्कात, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत.

मेळाव्यातील प्रमुख आकर्षणे व वैशिष्ट्ये :

मेळाव्यात उपस्थितांना प्रत्यक्ष स्टुडिओ भेट आणि अकादमीतील अत्याधुनिक डबिंग, क्रोमा, एडिटिंग, पॉडकास्ट आणि शूटिंग स्टुडिओ प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

मार्गदर्शन: अकादमीतर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती व करिअरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

नवोदितांसाठी संधी: मीडिया, चित्रपट आणि दृकश्राव्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांना कौशल्य विकास विभागाची मान्यता असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागींना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येते. अकादमीच्या वतीने सर्व महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीकडून करण्यात आले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -