प्रकाश पर्व कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर, दि.२४ :  श्री गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंतीच्या (प्रकाश पर्व) निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कस्तूरचंद पार्कवर आयोजित मुख्य समारंभात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले.

    कामठी रोड वरील गुरुद्वारा सिंग सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्कवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन श्री गुरुनानक देव यांना अभिवादन केले. याप्रसंगी गुरुद्वारा सिंग सभेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
    ०००००

    - Advertisement -