मुंबई, दि. २७ : भारत निवडणूक आयोग राबवित असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांतून प्रसारित करण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षणाची संकल्पना, नियमित पुनरीक्षणापेक्षा त्यातील फरक, या मोहिमेची उद्दिष्टे, गणना प्रपत्र (Enumeration Form), आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांची भूमिका, घरभेटींची कार्यपद्धती, नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतर, मृत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया, मतदार यादीची अचूकता, ऑनलाइन सुविधा, Voter Helpline App आणि NVSP Portal चा वापर, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा, दुर्गम भागातील पुनरीक्षण, युवक मतदार नोंदणी, अफवा व गैरसमजांपासून सावध राहण्याबाबतची माहिती; तसेच मतदारांनी घ्यावयाची काळजी आदी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर श्री. चोक्कलिंगम या मुलाखतीद्वारे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही विशेष मुलाखत बुधवार दि. 29 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता
महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे; तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. 29, 30, 31 जुलै आणि 1 व 3 ऑगस्ट 2026 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि ‘न्युज ऑन एआयआर’ या अँप वरून प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलखतीचे निवेदन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
विशेष सखोल पुनरीक्षण ही मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून प्रत्येक पात्र नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मतदार नोंदीची खातरजमा करावी, असे आवाहनही या मुलाखतीतून करण्यात आले आहे.
0000
जयश्री कोल्हे/स.सं.





















WhatsApp