
मुंबई,दि. ११ : येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी तातडीने शासनाला प्रस्ताव पाठवावे, तसेच नागरिकांना विनाखंड सुरळित वीज पुरवठा होईल यासाठी संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने कार्यवाही करावी त्यासाठी मागणीप्रमाणे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत असे निर्दैश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्रालयात येवला विधानसभा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, येवल्याचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, महावितरण नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश थुल, मालेगावचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, मनमाड कार्यकारी अभियंता संजय तडवी, योगेश निकम कार्यकारी अभियंता चांदवड,यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, नागरिकांना अखंडित व दर्जेदार पाणीपुरवठा मिळणे गरजेचे आहे. यासाठी भविष्यातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी देऊन ही कामे हाती घेणे अतिशय आवश्यक आहे.यासाठी चिचोंडी एमआयडीसी येथे १x५ एमव्हीएचे नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण करणे,कुसुर येथे १०५ एम.व्ही.ए चे ३३/११ केव्ही नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणे,पिंपळगांव जलाल येथे १४५ एम. व्ही.ए चे ३३/११ केव्ही नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणे,सोमठाण देश येथे २x५ एम.व्ही.ए चे ३३/११ केव्ही नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणे,खेडलेझुंगे ता. निफाड येथे १४५ एम.व्ही.ए चे ३३/११ केव्ही नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणे,३३/११ केव्ही सावरगांव उपकेंद्र येथे १x५ एम.व्ही.ए चे अतिरिक्त विद्युत रोहित्र बसवणे,३३/११ केव्ही चिचोंडी उपकेंद्र येथे १x५ एम.व्ही.ए चे अतिरिक्त विद्युत रोहित्र बसविणे,३३/११ केव्ही तांदुळवाडी उपकेंद्र येथे ५ एम. व्ही.ए ऐवजी १० एम.व्ही.ए ट्रान्सफार्मर बसविणे,३३/११ केव्ही जळगांव नेऊर उपकेंद्र येथे ५ एम.व्ही.ए रोहीत्राची क्षमता वाढवून १० एमव्हीए करणे,३३/११ केव्ही अंदरसुल उपकेंद्र- ३x५ एम. व्ही.ए ऐवजी २०१० एम.व्ही.ए विद्युत रोहित्र बसविणे,३३/११ केव्ही उपकेंद्र लासलगाव ता. निफाड येथे १४५ एम.व्ही.ए चे अतिरिक्त विद्युत रोहित्र बसविणे,३३/११ केव्ही उपकेंद्र नांदुरमध्यमेश्वर ता. निफाड येथे १४५ एम.व्ही.ए चे अतिरिक्त विद्युत रोहित्र बसविणे,या कामांना मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.
येवला औद्यागिक क्षेत्रात विद्युत उपकेंद्राकरीता एमआयडीसीने दिलेली जागा ताब्यात घेऊन हे काम प्राधान्याने सुरू करण्यात यावे.३३/११ केव्ही विखरणी उपकेंद्र येथील कातरणी फिडर १० एमव्हीएच्या ट्रान्सफार्मरवर टाकून दिवसा शेतीसाठी वीज देण्यात यावी,येवला विधानसभा मतदार संघातील सर्व भागात शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीज देण्याची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही संबंधितांनी करावी. तसेच वाढत्या वीजेची मागणी पूर्ण करत विनाखंड नागरिक,शेतकरी यांना वीजपुरवठा व्हावा यासाठी मागणीप्रमाणे अतिरीक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात यावे. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार रोहित्रांची क्षमता वाढ करावी मंत्री भुजबळ यांनी निर्देश दिले.
००००
वंदना थोरात/विसंअ

















WhatsApp