ब्रिटनचे राजकुमार आणि राजकुमारी यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. १६ : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन (केट) यांनी मुंबईच्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ओळख करून घेण्यासाठी मुंबई मेट्रोला भेट दिली. यावेळी त्यांनी विधान भवन मेट्रो स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) असा मेट्रोतून प्रवास केला.

    या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील मेट्रो सुविधांचा तसेच आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेतला. मुंबईच्या शहरी वाहतूक व्यवस्थेतील मेट्रोचे महत्व या भेटीच्या माध्यमातून अधोरेखित झाले.

    000

    संध्या गरवारे/विसंअ

     

     

    - Advertisement -