अमरावती , दि. 16: आदिवासी महिलांच्या उत्पादित वस्तूंना ‘मेळघाट हाट’मुळे हक्काचे व्यासपीठ मिळेल व यातून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून मेळघाटातील आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र अमरावती शहरामध्ये ‘मेळघाट हाट’ या नावाने लवकरच सुरु करण्यात...
धुळे
‘शुभ दिपावली स्वच्छ दिपावली’ या उपक्रमांतर्गत दिवाळीपूर्वी नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावी – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
0
मुंबई, दि. 11 : “शुभ दिपावली स्वच्छ दिपावली’ या उपक्रमांतर्गत दि. १५ ते ३१ ऑक्टोबर या पंधरवड्यात मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, सुधारणा व दुरुस्ती करुन आगामी दिवाळीपूर्वी नागरिकांना, स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई मनपा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सूचना केल्या.
आज चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे मुंबई उपनगर जिल्हा,...
मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस...
धुळे
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
0
ठाणे, दि. (जिमाका) : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास...
नागपूर,दि.5 : नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री.गोळवलकर (गुरुजी) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या समवेत आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.
मुंबई दि. १६ – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
रुग्णालयातून बाहेर पडताना श्री मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या...
पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ.श्रीराम सावरीकर, देवदत्त...
नवी दिल्ली, २३ :बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल त्याला ‘ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती...
मराठवाडा हे नाव पडले कसे…?
मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल.. त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली.. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला ते आपण.. आज पासून...
मुंबई, दि. ६ : भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात...
अमरावती, दि. १६ : सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी उद्यान रचना, वृक्षलागवड, आवश्यक निधी आदी सविस्तर सादरीकरण करावे व कामाला चालना द्यावी. हे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. दर पंधरवड्याला कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
नांदगावपेठनजिक वन वाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन...
धुळे
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
0
मुंबई, दि. ४:- ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील...
धुळे
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
0
मुंबई, दि. ३० :- केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा...
मुंबई, दि. 5 : प्रबोधनकार केशव ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदन केले.
आज दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहायक आयुक्त प्रशांत सकपाळ, दालनाच्या व्यवस्थापक निलिमा कामत उपस्थित होत्या.
या दालनात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, लढा, आंदोलन, मोर्चे, महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ कशी रोवली, कर्नाटक सीमाप्रश्न,...
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी काळजी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल.
आजाराची प्रमुख...
मुंबई, दि. 6 : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून दि. 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दि. 9 ते 17 ऑगस्ट,...
धुळे
कोरोनात निराधार झालेल्या कुटूंबियांच्या पुनर्वसनात नाशिक जिल्हा प्रशासनाचे काम चांगले – विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
0
नाशिक दि. 15 एप्रिल 2022 (जिमाका वृत्तसेवा): कोरोनाकाळ निश्चितच वाईट होता. अनेक कुटुंबे उध्वस्त,निराधार झाली. अनेकांचे पालकत्व हिरावले गेले. अशा कुटुंबियांचे पुनर्वसनात नाशिक जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने
कोरोनात विधवा झालेल्या भगिनींना मालमत्तेत हक्क मिळणार आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना विधान...
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात आज 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत पोलीओचा डोस पाजण्यात आला. जिल्हास्तरीय शुभांरभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात उपस्थित बालकाला पोलीओ लसीचे दोन थेंब पाजूण करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, बाह्य संपर्क अधिकारी डॉ यास्मीना चौधरी, अधिसेविका श्रीमता कुलकर्णी, सहायक अधिसेविका श्रीमता...
धुळे
संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
0
पुणे, दि.२९ : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या श्री मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही. कलाकारांच्या चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते. साहित्य, कला यातून साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला...