28.3 C
Pune
शुक्रवार, एप्रिल 25, 2025
Darshan Police Time Header
ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ठाणे, दि.६ (जिमाका): नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी  होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे. रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रीहनुमानांना वंदन, जयंतीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 15 :- “श्री प्रभूरामांचे परमभक्त, महापराक्रमी वीर, पवनपुत्र, बजरंगबली श्रीहनुमानजी हे अखंड भारतवर्षाचं दैवत, आदर्श आहेत. राज्यात, देशात गावोगावी असलेल्या त्यांच्या देवळांमध्ये आपल्याला शक्ती, भक्ती, युक्ती, त्याग, पराक्रमाचं विश्वरुप दर्शन घडतं. श्रीहनुमानजींचं संपूर्ण जीवन प्रभूश्रीरामांना, सीतामाईंना समर्पित होतं. समर्पित जीवनाचा आदर्श श्रीहनुमानजींनी दाखवला. त्यांच्या जीवनातील प्रसंगांतून संकटांतून मार्ग काढण्याची प्रेरणा, ताकद मिळते. आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्रीहनुमानजींना...
कुटासा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
अकोला–जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्पअंतर्गत निर्माणधीन कुटासा येथील पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज केली. कुटासा येथील निर्माणधीन पुल भामोद, लोतवाडा, इसापूर व पिंपळोद या ग्रामीण भागाला जोडणारा मुख्य रस्ता असून यामुळे चार हजार एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले. 000
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट
पंढरपूर दि. 29 : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी...
वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे पुणे दि.२- पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 6 (रा.नि.आ.) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी...
महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे ‘महावीरोत्सव’ संपन्न
मुंबई दि. 15 : तीर्थंकर महावीरांनी सत्य, अहिंसा व अपरिग्रहाची शिकवण दिली. महावीरांच्या विचारातून प्रेरणा घेत महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक व्यक्तीने महावीरांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी असे सांगताना ‘शंभर हातांनी कमवा, परंतु हजार हातांनी दान करा’, असा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिला. भगवान महावीरांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे गुरुवारी (दि. १४) महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात...
श्री समर्थांची शिकवण समाजासाठी दिशादर्शक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
औरंगाबाद, दि.27  (विमाका) :- समाजाच्या जडणघडणीला संत-महात्मे दिशा देत असतात. श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण अखिल विश्वाला मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यादृष्टीने चांगले आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी समर्थांची शिकवण आचरणात आणावी, असे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे सांगितले. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनात राज्यपाल बोलत होते. मंचावर यावेळी संत साहित्य शिक्षण...
‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
पंढरपूर, दि. २8, (उ. मा. का.) – सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री...
राज्यात होणारी फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा प्रेरणादायी ठरेल – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 2 : राज्यात 17 वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य  आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-2022 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री श्री.महाजन बोलत होते. मंत्री श्री.महाजन म्हणाले, 17 वर्षाखालील...
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
अ.क्रं जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव 1 अमरावती एकविरा गणेशोत्सव मंडळ 2 औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ 3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ 4 भंडारा आदर्श गणेश मंडळ 5 बुलढाणा सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली 6 चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड 7 धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर 8 गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी 9 गोदिंया नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी 10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी 11 जळगांव जागृती मित्र मंडळ, भडगांव 12 जालना संत सावता गणेश मंडळ, परतूर 13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी 14 लातूर बाप्पा गणेश मंडळ 15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव...
त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी लवकरच बैठक घेऊ – विधानसभा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नाशिक दि. 15 एप्रिल 2022 (जिमाका वृत्तसेवा): त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अनेक परवानग्या तांत्रिकबाबीमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित आहे. तसेच देवस्थानचे प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुरातत्व, नगररचना आणि पर्यावरण विभाग सोबत लवकर संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानचे विश्वस्त व अधिकारी यांच्याशी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विकासकामांचा आढावा घेऊन...
पंडित दादासाहेब भातंबरेकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक 27 फेब्रुवारी, 2022 (जिमाका वृत्तसेवा): ‍संगीत भूषण पं. दादासाहेब भातंबरेकर म्हणजे संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व असून त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून महानगरपालिकेने त्यांचे नाव येथील मार्गाला देऊन अतिशय महत्वपूर्ण काम केले. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीसे मळा, कॉलेज रोड येथील...
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून...
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांना गती द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे, दि. 2: पुणे शहरातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील पूल पाडून नवीन बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम गतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल येथे पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत  ते बोलत होते....
ऊसतोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
मुंबई, दि. 12 : राज्यात सुरु होणाऱ्या साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात ऊस कारखान्यांकडे स्थलांतरित होणाऱ्या ऊस तोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, पशुसंवर्धन...
साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. 24 : साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची,  माहिती  बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माध्यमांना दिली. नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साखर व सहकार संबधित विविध विषयांवर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे...
डॉ.सी.डी.देशमुख यांच्या नावाला साजेशी वास्तू साकारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अलिबाग,दि. 27 (जिमाका) :- मूळ रोह्याचे असलेले डॉ. चिंतामणराव देशमुख उर्फ सी. डी. देशमुख हे एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या नावाला साजेशी वास्तू उभी करावी, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथे डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी श्री. पवार...
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर
मुंबई दि. 28 : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के या प्रमाणात निधी दिला जातो. या योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जून 2023 मध्ये 27 कोटी 31...
पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे दि.२: पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, उदयनराजे भोसले, हेमामालिनी, आमदार भिमराव तापकीर, माधुरी...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp