नंदूरबार व पालघर येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. २७ : आरोग्यसेवांना बळकटी यावी याकरिता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी शासनाकडून अतिदुर्गम भागातही नंदूरबार व पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असे उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.
नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यांत विशेषोपचार रूग्णालय सुरू करण्याबाबत विधानपरिषद...
मुंबई, दि.3 : दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देवून मुंबादेवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. माजी आमदार राज पुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.
००००
Governor Koshyari visits Mumbadevi Mandir on Durgashtami
Governor Bhagat Singh Koshyari visited the Shree Mumbadevi Mandir in Mumbai on the occasion of Durgashtami.
Former MLA Raj...
नागपूर दि. ११: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...
धुळे
उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
0
पुणे, दि. १५ : उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.
बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे...
पुणे दि.१६-कृषि क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हवेली तालुक्यातील वडमुखवाडी (चऱ्होली) येथील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री...
मुंबई, दि. २० : खेळण्याच्या अधिकाराचा पुनरुच्चार करत जागतिक बाल दिनानिमित्त रविवारी सकाळी चार हजारांहून अधिक मुले प्रियदर्शनी पार्क येथील सुरू असलेल्या ‘चला खेळूया’ उत्सवामध्ये सहभागी झाली होती. फुटबॉल, टेनिस, क्रिकेटचे सामने, मल्लखांब आणि अनेक साहसी खेळांमध्ये मुलांनी आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई जिल्हा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २० आणि २१...
अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व शेंडगाव येथे विकास आराखड्याद्वारे मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली. आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती...
धुळे
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त
0
मुंबई, दि. 1 (रानिआ) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार...
पुणे, दि.६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन करण्यात आले. शाळा सुधार कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानभवन पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,...
“तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली” अशा मराठी ‘श्रीवल्ली’कार विजय खंडारे या तरुणाला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून नुकतीच प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्याची अनपेक्षित भेट मिळाली. या अनोख्या भेटवस्तूमुळे आपल्याला आनंद झाला असून, ताईंनी दिलेल्या शाब्बासकीने यापुढे अधिक चांगलं काम करून दाखविण्याचं बळ मिळाल्याची प्रतिक्रिया विजयने व्यक्त केली आहे.
तब्बल १५ दशलक्षहून अधिकवेळा युट्यूबवर...
महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी
बंधनकारक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २७ : “राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
राजापूर, ता. येवला येथील गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबत सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना...
धुळे
पलुस तालुक्यातील सहा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी साडेचार कोटी निधी वितरित – सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
0
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 वर्षासाठी पलुस तालुक्यातील 6 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यातील 4 कोटी 50 लाख इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार व कृषि राज्यमंत्री...
मुंबई दि. 15 : तीर्थंकर महावीरांनी सत्य, अहिंसा व अपरिग्रहाची शिकवण दिली. महावीरांच्या विचारातून प्रेरणा घेत महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक व्यक्तीने महावीरांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी असे सांगताना ‘शंभर हातांनी कमवा, परंतु हजार हातांनी दान करा’, असा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिला.
भगवान महावीरांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे गुरुवारी (दि. १४) महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात...
मुंबई, दि. 6 (रा.नि.आ.) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी...
मुंबई दि, 12: अनुसूचित जाती / जमाती / विजा – भज / इमाव/ विमाप्र, शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या वतीने आज मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ घरोघरी तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आला. सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील भारतरत्न डॉ....
मुंबई, दि. 12 : विविध कला सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ईश्वरी कार्य आहे. कलाकार मंडळींनी कलाविष्काराचे सादरीकरण ईश्वराची अर्चना समजूनच करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ईप्टाच्या 49 व्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष...
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्ष म्हणून स्नातकांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना ते बोलत...
सातारा, दि.२६ : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव निधी, बास्केटबॉल मैदान दुरुस्ती, व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण व वसतिगृह, संरक्षक भिंत रंगकाम...
सांगली दि. 18 (जिमाका) :- मिरज तालुक्यातील बोलवाड फाटा ते तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरमीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. रस्त्याची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या कार्यक्रमास टाकळी तपोवनचे प. पु. शिवदेव स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. कोरे,...
मुंबई, दि. २१ : राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश करण्यात आला आहे, असे बार्टीचे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची सेवा देताना सेवा पुरविणारा अधिकारी, कालावधी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी...