28.3 C
Pune
शुक्रवार, एप्रिल 25, 2025
Darshan Police Time Header
विधानसभा लक्षवेधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे होणार – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये राज्यात पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 30 हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे सुरु असून दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांना येत्या दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजूरी देणार असून...
मालेगाव, दि. 30 (उमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या  सर्व विभागांनी आपापल्या जिल्ह्यात सांघिकपणे कार्य करीत विकास कामांना गती द्यावी. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुलात आज सकाळी नाशिक विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष...
संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई,दि.२८ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान  आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात.  सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि  बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज ९ मार्च २०२३ पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत....
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे उद्या लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार...
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृश्य...
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ,पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्री यांचे प्रधान...
पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. 27 : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी  गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष  आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पोलिस गृहनिर्माण संदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक  आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.             या बैठकीला मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर...
जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 13 : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यस्तरीय कृती गट स्थापन करण्यात आला...
राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट
नवी दिल्ली , २८ : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली . महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. श्री. कोश्यारी यांनी राज्यपाल श्री. बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राज्यपाल श्री. बैस यांना उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराचे छायाचित्र भेट दिले. ०००
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत...
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी श्री.वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल...
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : पावसाळयाच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी मराठवाडयातील जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी आज मराठवाडा विभागातील आठही जिल्हयांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त...
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड, दि. 8 (जि. मा. का.) साखर कारखान्यांनी कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे. कारखान्यांनी उसापासून साखरेसह इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. तसेच, कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे, त्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज केले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) या ६० किलो प्रति दिवस क्षमता असलेल्या विस्तारित...
समर्पित आयोगाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार – महासंवाद
संबंधितांचे म्हणणे ऐकत लेखी निवेदनही स्वीकारले औरंगाबाद, दि.22, (विमाका) :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या समर्पित आयोगाने औरंगाबाद विभागातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरीकांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेत लेखी निवेदनेही यावेळी स्वीकारले. विभागीय आयुक्त कार्यालयात समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य महेश झगडे, डॉ.नरेश गिते, ह.बा.पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार,...
राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 30 : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पदावरुन जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून...
शैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 29 :- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक संस्थांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान शाळांच्या दर्जावाढीसाठी इरादा पत्रे आणि मान्यता पत्रे प्रदान केली जात आहेत, हा पारदर्शक पायंडा सुरू झाल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक संस्थांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित...
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
 नवी दिल्ली, दि. ३० : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर...
‘वन सेवा केंद्र’ सुरू करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १० : सामान्य नागरिकांना “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ‘वन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्‍यातील व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला...
महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस, महानगरपालिका बांधकाम या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही काम पूर्ण करावी. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाणे शहर...
कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी हवा लोकसहभाग
 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचा मार्गदर्शनपर विशेष लेख….  पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. डेंग्यू, चिकुनगुन्या,...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp