29.4 C
Pune
बुधवार, जानेवारी 15, 2025
Darshan Police Time Header
राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. मंत्री श्री. भुसे यांच्या दालनात राज्यातील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील पथकर नाका, महामार्गावरील खड्डे, मार्गिकेची शिस्त, वेग याबाबत चर्चा, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
मुंबई, दि. 2 :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ...
महाराष्ट्राला कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत ८ हजार ४६० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम
नवी दिल्ली, 2 : केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत वर्ष 2025-26 पर्यंत  होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. या योजनेंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत स्मार्ट आणि अचूक कृषी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत.  ही योजना संपूर्ण भारतात...
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. 2 : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. ‘पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित करताना झालेला गैरव्यवहार’ याबाबतचा प्रश्न विधानसभा...
शहापूरमधील दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू, तीन जखमींवर उपचार सुरु; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
ठाणे, दि. 1 (जिमाका) : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री...
गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 1 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची  सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.             मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, पर्यटन जिल्हा म्हणून...
शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी – महासंवाद
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच यावेळी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून शासन आपल्या पाठीशी...
बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या  दुर्घटनेमध्ये शून्य ते 18 वर्षे वयोगटातील 22 बालके अनाथ झालेली आहेत. ही बालके व त्यांचे कुटुंबीय सद्यस्थितीत चौक ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेमध्ये राहात आहेत. या बालकांमध्ये बहुतांश बालके ही आदिवासी...
पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करावी- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दि. 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ प्रदानासाठी आवश्यक असलेल्याअनुषंगिक बाबींची पूर्तता कृषी विभागाने मोहीम स्तरावर तातडीने पूर्ण करावी, अशासूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीदादाजी भुसे यांनी दिल्या.आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पीएम किसान सन्मान योजना वनियमित पीककर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोहत्सानपर अनुदान योजना बाबतच्याआढावा बैठकीत ते बोलत होते....
राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 1 : राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या चार महिन्यांत केलेल्या कार्याचा सचित्र लेखा-जोखा असलेल्या ‘राजभवन पत्रिका’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. राज्यपाल सचिवालयाने तयार केलेल्या ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकामध्ये राज्यपालांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत घेतलेल्या गाठीभेटी, शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटी, उच्च शिक्षण व आदिवासी विकास, इत्यादी क्षेत्रात केलेले कार्य, जिल्हा दौरे आदी कामांची...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री दीपक केसरकर यांचे अभिवादन  
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील, विशेष कार्य अधिकारी श्री. इंदलकर, कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस...
समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुंबई दि. १ : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त...
पालकमंत्र्यांनी घेतला औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) :  पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यस्थिती इ. विषयांचा समावेश होता. या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्य अभियंता गवळी, कार्यकारी अभियंता येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मिरासे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, महिला बालविकास अधिकारी सुवर्णा...
राज्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन
दरवर्षी राज्यभरात  1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. मात्र, यावर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल...
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत...
पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना आवाहन
मुंबई, दि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत  सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2023-24 साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुदान योजनेसाठी इच्छुक शाळांकडून दि. 7 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पूर्तता...
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत – उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव वि.सी. रस्तोगी
नवी दिल्ली, २९:  प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्नरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीविषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी दुसऱ्या अखिल भारतीय शिक्षा कार्यशाळेत आयोजित चर्चासत्रात आज केले. प्रगती मैदान (ITPO) येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण -2020 च्या तिसऱ्‍या वर्धापन दिनानिमित्त दुसऱ्‍या अखिल भारतीय शिक्षण समागमाचे उद्घाटन, प्रधानमंत्री नरेंद्र...
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई, दि. 29 : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास...
महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि, 29 :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महसूल सप्ताहाचे आयोजन तसेच राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी...
ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. 28 : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. एमआयडीसी येथील ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टरच्या सोलर चरखा कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या टेक्सटाईल डिजिटल प्रिंटिंग युनिटचे उद्घाटन श्री. गडकरी...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp