मालेगावकडून येणारी धुळे- कळवण बस मेशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत पडली, मदतकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
न्याहळोद : पंचायत समिती धुळे अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत गर्भवती महिलांना शासनाकडून मोफत बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले.जि.प. महिला व बालविकास विभागाच्या सभापती धरती देवरे, जि.प. सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पंचायत समिती सभागृहात १४ रोजी गर्भवती मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील यांच्यासह पंचायत समिती...
धुळे
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू
0
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू. #Lockdown च्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या प्रचारार्थ नरडाणा येथे आयोजित प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वाधिक १०५ जागा भाजपाला मिळाल्या. जे हरले त्यांच्यासोबत शिवसेना निघून गेली. जनतेशी बेईमानी करून हे सरकार आले आहे.
याचबरोबर, विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला होता.मात्र शिवसेनेने सत्तेसाठी विश्वासघात करुन दुसऱ्यांशी घरोबा केला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी...
मुंबई, दि. १९ : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४१ गुन्हे दाखल केले आहेत.
अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २४१गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
यामध्ये...
आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणे प्रेम करते, अडी-अडचणीत सापडलेल्या मुलाला जिवाची पर्वा न करता संकटातून सहिसलामत बाहेर काढते, हे सर्वश्रुत आहेच, अशीच मातेच्या दातृत्वाची प्रचिती देणारी घटना संभाजीनगर शहरामध्ये घडली आहे. आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मातेने जिवाची पर्वा न करता स्वत:ची किडनी देऊन पोटच्या गोळ्याचे प्राण वाचविले आहेत, अनिता किशोर निकम असे या मातेचे नाव आहे.
संभाजीनगर जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक...
मुंबई, दि. 12 : नेहरूनगर रोड येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाने कारवाई करून या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.
एल वॉर्ड, कुर्ला (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरूनगर रोड येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर...
धुळे
महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ; येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट
0
मुंबई, दि.२४ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
विधान भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा या अभियानाचे मुख्य प्रवर्तक म्हणून पद्मश्री डॉ....
धुळे
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार
0
पुणे दि.26: विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या...
पुणे, दि. २८ : चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर ४ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीत रात्री ००.३० (सोमवारी रात्री १२.३० पासून) ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
नागपूर दि. १७ : आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी या सोबतच काही महत्त्वपूर्ण नियम अंगी बाळगणे आवश्यक असते. यश अशा नियोजित वाटचालीला मिळत असते. असा संदेश देणाऱ्या आर. जी. राजन यांच्या ‘लाइफ लेसन’ या पुस्तकाचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते आज रविवारी प्रकाशन झाले.
प्रेस क्लब येथील सभागृहात आज झालेल्या एका शानदार प्रकाशन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत...
मुंबई दि. 12 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘पंढरीची वारी’ छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि सामाजिक कार्यकर्ते, कलासंग्राहक परवेज दमानिया आणि रतन लुथ यांच्या संकल्पनेतून पंढरपूरच्या वारीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि नागरिक उपस्थित...
धुळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
0
मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचे (Opting Out) विकल्प मागविण्यात आले आहेत.
परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली...
धुळे
युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले; विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार
0
मुंबई, दि, 26- एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.
यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य...
राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि त्यांचा यासाठी होणारा अनावश्यक खर्च वाचावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे सुरु केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सुटण्यास मदत झाली आहे. एकाच ठिकाणी...
धुळे
कोच्छी पुनर्वसन प्रकल्पाची कामे मे अखेर पर्यंत पुर्ण करावीत – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
0
नागपूर दि.16 : जिल्ह्यातील कोच्छी प्रकल्पाची अपूर्ण कामे येत्या मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, कार्यकारी अभियंता सयाम, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोच्छी पुनर्वसनबाबत सुरु असलेल्या प्रकल्पातील कामाच्या स्थितीबाबत, पाटणसावंगी येथील नदी वळण संदर्भात, सावनेर व कळमेश्वर येथील...
मुंबई, दि. 11 : लम्पी चर्मरोग प्रतिबंधाकरिता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 123.88 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून जळगांव, धुळे, अकोला,कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार महाराष्ट्रात...
मुंबई, दि. 24: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि. 25 जानेवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
राष्ट्रीय मतदार दिन देशभरात दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्रात...
धुळे
पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
0
मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. डावखर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.
‘वर्षा’ आणि ‘तोरणा’ या...
मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवाजी पार्क येथील राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.
००००