25.7 C
Pune
बुधवार, जानेवारी 15, 2025
Darshan Police Time Header
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्याची तयारी – कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. 28 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या वेळी दिली. राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थलांतरित होत असल्याबाबतचा  प्रश्न सदस्य सचिन अहीर यांनी  उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत...
शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. २८ : शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका, सोयाबिन, तांदुळाच्या चुरीपासून पशु खाद्य निर्माण करण्यावर भर द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक...
गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. २८ : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे.  तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन अविष्कारांचा वेध घेवून संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव...
व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रामगावकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत  
मुंबई, दि.28: व्याघ्र संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी जगभरातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी याअनुषंगाने दरवर्षी २९ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. या दिनानिमित्त वाघांना तसेच इतर वन्य प्राण्यांना भेडसावणाऱ्या...
महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य
मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले.  महिलांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. फिरता निधी दुप्पट आपल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्र राज्य...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार
मुंबई दि. 27 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर बोलतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. या...
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामच्या १५० वा वर्धापन सोहळा  
मुंबई, दि. 27 : सन १८७४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.             यावेळी अंजुमन समुहातील विविध संस्थांमध्ये अध्यापन करीत असताना पी.एचडी. प्राप्त करणाऱ्या ५७ अध्यापकांचा तसेच विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.             अंजुमन संस्थेच्या मुंबई सेन्ट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात झालेल्या सत्कार...
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
नंदूरबार व पालघर येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. २७ : आरोग्यसेवांना बळकटी यावी याकरिता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी शासनाकडून अतिदुर्गम भागातही नंदूरबार व पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असे उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले. नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यांत विशेषोपचार रूग्णालय सुरू करण्याबाबत विधानपरिषद...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांशी संवाद; आधुनिक शेतीबरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन
मुंबई दि २७ :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. राजस्थानच्या सीकर येथे आज प्रधानमंत्री...
‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान
विशेष लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवार २७ जुलैला राजस्थान येथील सिकर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा हा विशेष लेख. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या ‘अमृत काळात‘  चोहोबाजूंनी देश विकासाचा समृद्धपथ पादक्रांत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कना असलेला देशातील शेतकरी सुद्धा या विकास यात्रेचा साक्षीदार...
लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये
मुंबई, दि.२६ : लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तीन कोटी रुपयांचा धनादेश आज कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलोन यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते. विधिमंडळातील...
घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 26 : आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या विविध टप्प्यावर निधी उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र संबंधित विभागाकडे निधी प्राप्त होऊनही इतर यंत्रणेसोबत समन्वय नसल्याने सदर निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, ही गंभीर बाब आहे. याबाबत...
विधानपरिषद लक्षवेधी
राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत मुंबई, दि. २६ : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. “सांगली येथील वैदय योगेश माहिमकर यांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांच्याकडे येत असलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांचे रक्त सांगलीमधील वेगवेगळ्या ४ नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले, त्यानंतर या चारही...
विधानसभा लक्षवेधी
नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २६ : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर...
विधानसभा लक्षवेधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री...
रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २५ :- शिरीष कणेकर यांच्या निधनाने रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेट आणि चित्रपट हे शिरीष कणेकर यांचे आवडीचे विषय होते. आयुष्यातील कुठलेही अनुभव क्रिकेट आणि सिनेमाशी रंजक पद्धतीने जोडण्याची त्यांची हातोटी होती. क्रिकेटपटू आणि चित्रपटकलावंत यांच्याशी असलेली त्यांची कलासक्त मैत्री आणि त्यातून त्यांनी...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता – महासंवाद
सोलापूर, दि. 25( जिमाका):- श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा प्रशासनाने तयार केलेला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता असून हा आराखडा 27 जुलै 2023 रोजी शासनाला सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.             श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित
पुणे, दि. २५ : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार...
विधानसभा प्रश्नोत्तरे :
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमणार – मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. 25 : राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. देसाई म्हणाले...
विधानपरिषद इतर कामकाज :
पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. २५ : ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp