25.7 C
Pune
बुधवार, जानेवारी 15, 2025
Darshan Police Time Header
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २५ :- आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी...
टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर !
सातारा दि.२४ : टोळेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला.  त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर केला. संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून माहिती दिली.  नैसर्गिक आपत्ती दरम्यान सॅटेलाईटच्या फोनचा ग्रामस्थांनी सक्षमपणे वापर केल्याने समाधान व्यक्त...
श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा प्रशासनाकडून श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासाचा 173 कोटीचा आराखडा सादर सोलापूर, दिनांक 24( जिमाका) :- जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी केलेला 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा शासनाला त्वरित सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे...
महाराष्ट्राच्या दालनांना ‘भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळ्यात’ प्रतिसाद 
नवी दिल्ली २४ : भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील  भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग  आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. या दालनांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची भावना सहभागी संस्थांनी व्यक्त केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या अधिनस्त निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स (EPCH) द्वारे इंडिया एक्स्पो सेंटर आणि नॉलेज पार्क, ग्रेटर नोएडा येथे हस्तकलेसाठी निर्यात...
इरशाळवाडी येथील आपत्ती बाधित कुटुंबांना आदिवासी विकास विभागामार्फत ४१ लाखांची मदत – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई, दि. २४ : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इरशाळवाडी, जि. रायगड येथील नैसर्गिक आपत्तीबाधित आदिवासी कुटुंबांना ४१ लाखांची मदत दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी करण्यात आली आहे. याबाबतचा निधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण यांना वितरित करण्यात आला असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. या दुर्घटनेत ४१ कुटुंब हयात असून केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत या आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या...
विधानसभा लक्षवेधी
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा वर्ग करण्याची १५ दिवसांत कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. २४ :- पालघर जिल्ह्यात १५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून येत्या १५ दिवसांत त्यासाठी राज्य विमा कामगार मंडळास जागा वर्ग करण्याची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य राजेश पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २४: आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी  मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा...
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 24 : “आपल्या अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा विविध माध्यमांत अमीट ठसा उमटवणारे, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर अनेक कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “जयंत सावरकर यांनी चार पिढ्यांसोबत काम केले. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचे विश्व इतके अनुभवसिद्ध...
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि. २३ :– बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेदेखील मोठे...
जिल्हाधिकाऱ्यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी
चंद्रपूर, दि. 23 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना करताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पुरामध्ये अडकलेल्या...
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई, दि.२३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन  केले. 000
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या...
आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. २२ : अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) दिले. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा...
पालकमंत्र्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट; अत्याधुनिक कक्ष उभारणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.22 (जि.मा.का.) : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून पाहणी केली. अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले 846 ग्रामपंचायतीमध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे उद्घोषणा देऊन ग्रामस्थांपर्यंत संदेश पोहचला जातो. जिल्हा आपत्ती...
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाच्या सुविधा उभारणार – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, हसन मुश्रीफ
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सोयी सुविधांची केली पाहणी जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर 40 कोटीतून औषधे व साहित्याचा तातडीने होणार पुरवठा हृदय व गुडघ्यांच्या शस्त्रक्रीयेसाठी अद्ययावत सुविधा सुरू करण्याचे दिले निर्देश   कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): राज्यातील सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयामध्ये चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी लवकरच उभा केला जाणार आहे.  बँकांकडून  कर्ज स्वरुपात मोठ्या...
आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक
मुंबई, दि. २२ :  केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन...
विधानसभा कामकाज
इरशाळवाडी दुर्घटना ; मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत  मुंबई, दि. २१ : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः नेतृत्व करीत मदत कार्यात सक्रिय सहभाग...
विधानसभा लक्षवेधी
राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विमानतळांच्या विकासासाठी नोडल एजन्सीची स्थापना करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत या संदर्भात सदस्य अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला...
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत चौकशी समितीला एक महिन्याची मुदतवाढ –सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 21 – रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या विनंतीनुसार, शासनाने समितीला एक महिन्याकरिता मुदतवाढ दिली...
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर          मुंबई, दि.21 :  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात येत आहे. मात्र शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. शालेय...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp