मुंबई, दि. 21 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2023 पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी...
धुळे
मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
0
मुंबई, दि. 20 : राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
आजपासून ते २० ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या...
अलिबाग, (जिमाका) दि. 20 :- बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी...
23 जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करण्याच्या सुचना
चंद्रपूर, दि. २० : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. पुरग्रस्तांना मदत करताना प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या आणि तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश चंद्रपूर,गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे...
धुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फूड पॅकेटस, ब्लॅकेटस्, कंटेनर यासह मदत साहित्याचा ओघ
0
अलिबाग,दि.20(जिमाका) :- च्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्थापुढे आल्या आहेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी...
धुळे
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठित समितीला मुदतवाढ – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
0
मुंबई, दि. २० : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्य समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२३ मंजूर
‘एक देश, एक करप्रणाली‘ सूत्रानुसार जीएसटी
कायद्यात दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २० :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना सभागृहास सांगितले की, ‘एक देश एक...
मुंबई, दि. 19 : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
दुधाला रास्त भाव दिल्याने शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेसह विविध संघटनाच्यावतीने मुंबईत आज श्री. विखे- पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत...
धुळे
चांगल्यारितीने झालेली नाले स्वच्छता व इतर पावसाळापूर्व कामांमुळे मुसळधार पावसातही मुंबईतील जनजीवन सुरळीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
मुंबई, दि. 19 : मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे, असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पावसाळापूर्व कामे योग्यरितीने पार पडल्याची पोचपावती दिली.
मुंबईत पाऊस कोसळत असताना महानगरपालिका आयुक्तांसह सर्व विभागांचे सहायक आयुक्त व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष...
मुंबई, दि. 19 : धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवून योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये धर्मादाय रूग्णालय आदर्श कार्यप्रणाली व समिती स्थापन करण्याचा...
सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करणार – मंत्री उदय सामंत
सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी (विशेष चौकशी समिती) गठित करून चौकशी करण्यात येईल. या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री....
मुंबई दि 18 : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विविध उपक्रमांचा तसेच भविष्यातील योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव...
विधान परिषद इतर कामकाज
मुंबई, दि. 18 : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी श्री. सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोणत्याही महिलेचा छळ झाला असेल, तर ते...
मुंबई, दि.१८ : सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन...
धुळे
उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
0
मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य...
मुंबई, दि. 17 : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलीस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल,...
मुंबई, दि. १७ – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेचे तालिका सभापती जाहीर केले. सदस्य सर्वश्री ॲड. निरंजन डावखरे, अरुण लाड, राजेश राठोड, नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावार, यशवंत माने, अमित झनक यांची...
धुळे
कृषि विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
0
मुंबई, दि. 15: महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशी सूचना कृषीमंत्री...
नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न,नागरी...
मुंबई, दि. 15: मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे. तसेच आगामी काळात राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमधील प्रायोगिक तत्त्वावर 500 गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास...