मानवी आहारातील पोषक तत्त्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी पौष्टिक तृणधान्य ही काळाजी गरज असून त्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष...
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी आठ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. रोख्यांची विक्री ही लिलावाने करण्यात येणार असून या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या...
बारामती दि.१६ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात उभारण्यात आलेल्या व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे राजेश सातपुते व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या उद्योगामुळे १०० तरुणांना रोजगार...
मुंबई, दि. 17 :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
श्री सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधानपरिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री...
धुळे
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा सकारात्मक अर्थसंकल्प – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
0
मुंबई, दि. ११ : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड येथील ऐतिहासिक संस्था मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वास्तूचा कायापालट करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रूपये प्रस्तावीत करण्यात आले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात झालेल्या या घोषणेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी या संस्थेला...
मुंबई. दि.4 : राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य प्रकारे होत असून याकरिता बृहन्मुंबई...
धुळे
बोरिवली येथील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन
0
मुंबई, दि. १२ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता बोरिवली येथील वसतिगृहात शासनामार्फत मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येते. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता इच्छुकांकडून १७ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
वसतिगृहामधील प्रवेश नियमावली पुढील प्रमाणे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास...
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज येथील सामाजिक न्याय भवन येथे भेट दिली. सामाजिक न्याय भवनच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून (एसटीपी) फुलविण्यात आलेल्या परिसरातील बगीचाची पाहणी त्यांनी केली. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी हे एसटीपी प्रकल्प बसविण्यात आले असून पाण्याच्या पुनर्वापराचा नवा मापदंड निर्माण...
धुळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध
0
मुंबई, दि.७ :महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१, लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची...
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी 11 पासून पेंशन अदालतचे आयोजन करण्यात येत आहे. प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी), महाराष्ट्र 1 मुंबई येथील अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील.
प्रधान महालेखाकार (लेखा...
धुळे
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. चहांदे ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ
0
नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्या श्वेताली ठाकरे, डॉ. साधना...
चंद्रपूर, दि.5 : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व समाजाची प्रगती व उन्नतीच्या दिशेने योग्य प्रवास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सर्वांनी सहभागी होण्यासाठी व गावाच्या प्रगतीचे चिंतन, मंथन करण्यासाठी सामाजिक सभागृहाचा उपयोग करावा. सामाजिक सभागृहे ही केवळ दगडमातीची इमारत न राहता विचार आणि प्रबोधनाची केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर...