एरवी नितांत सुंदर आणि शांत असणारा सागर पावसाळ्यात मात्र रौद्र रुप धारण करतो. त्याचेहे रौद्ररुप अनेकवेळा किनाऱ्यावरील नागरी वस्तीला अनुभवास येते. त्यातही पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात ज्यावेळी समुद्राला मोठे उधान येते. त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये 26 वेळा मोठे उधान येणार...
मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.
राज्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत...
धुळे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा – मुंबई शहर व उपनगर उपायुक्तांचे आवाहन
0
मुंबई, दि. 06 : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे व मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे...
मुंबई उपनगर, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने १६६ – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते...
मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. २९ व शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.
महाआवास अभियानात...
मुंबई दि. ३०: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या जनजागृतीसाठी क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून श्री. पांढरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा ज्योत रॅली बृहन्मुंबई महापालिकेनजीकच्या सेल्फी पॉइंट पर्यंत काढण्यात आली.
गेट वे ऑफ इंडिया येथे...
धुळे
निवडणूक विषयक कामे अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शकपणे करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
0
बीड, दि. 06, (जि. मा. का.) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून निवडणूक विषयक कामकाज अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.देशपांडे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक...
मुंबई, दि. ०६ – सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय प्रकारांसाठी ३३ लेखक, साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना...
धुळे
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
0
मुंबई, दि. 25 : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत...
धुळे
सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्धतेबाबत सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
0
मुंबई दि. 29 : सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत शिष्टमंडळ, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मंत्रालयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित...
मुंबई, दि. 4 :देशातील पूर्वोत्तर राज्यांत तसेच उत्तरप्रदेश व बिहार या राज्यामध्ये वराह प्रजातीत ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने या राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इतर राज्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ हा वराहमधील विषाणूजन्य रोग आहे. हा...
राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने राज्यात एकूण ४१ कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत आहेत. मा. उच्च न्यायालयाकडून प्राप्त माहितीनुसार सहा अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात कुटुंब न्यायालयांची संख्या वाढविण्याबाबत विधान परिषद सदस्य विलास...
धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. या भागातील वाड्या-वस्त्यांना बारमाही रस्ता जोडण्याचे नियोजन सुरू आहे. याबरोबरच या भागातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य, या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये साथरोग प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित...
मुंबई, दि. 1 : आईसलँडचे भारतातील राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
भारत आणि आईसलँड भूऔष्णिक ऊर्जा निर्मिती या विषयावर सहकार्य करीत असून या संदर्भात टास्क फोर्स देखील नेमण्यात आला असल्याचे, राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी सांगितले. भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांना देखील आपण भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ ऊर्जा क्षेत्राशिवाय आईसलँड भारताशी सांस्कृतिक...
मुंबई, दि.17 : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रवींद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार...
धुळे
कामगारांच्या मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना सुनावले
0
चंद्रपूर,दि. 25 सप्टेंबर : भद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. या कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावक-यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना जाब विचारला.
केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या नंतरही सुधारीत नियुक्तीपत्र का दिले नाही. तसेच...
मुंबई, दि. ८ : सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्य पदक/सेवा पदक धारकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील तिघा जणांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
नायक नीलेश मल्हारराव देशमुख (जळगाव) यांना विशिष्ट सेवा पदक (सेना मेडल) प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना रुपये 12 लाख रुपये या योजने अंतर्गत मंजूर...
धुळे
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाणार – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत – महासंवाद
0
पुणे, दि. ६ : पुढील वर्षांपासून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाईल आणि प्रत्येक वर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा शासनातर्फे सोहळा साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एसएसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात केली.
श्री.सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर...
धुळे
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्राची मान्यता – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मानले आभार
0
मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत.
तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून...
धुळे
औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
0
पुणे, दि.८ : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतिगृह संकुलाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू,...