30.7 C
Pune
शुक्रवार, एप्रिल 25, 2025
Darshan Police Time Header
तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
दर्यापूर, दि.4: राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाचा शैक्षणिक दर्जा सुधारावा,यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू असून,शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सोबतीला जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती व्हावी,यासाठी कृती आराखडा तयार असून त्याच अनुषंगाने  तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रविवारी केले. त्यांनी दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला...
आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन
नागपूर, दि.  19 : नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना मदतकार्यात  उपयुक्त ठरू शकणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे  प्रकाशन झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर व अमरावती विभागातर्फे तात्काळ संदर्भासाठी ही आपत्ती व्यवस्थापन माहिती पुस्तिका  तयार करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बैठकीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला . त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन...
विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.१९ : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी...
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाची उद्यापासून पंधरा वॉर्डमध्ये सुरूवात – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 30 :  ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये उद्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ‘माझी मुंबई, स्वच्छ  मुंबई’ हे अभियान मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येणार...
लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका ठरली; लातूर सर्व आघाड्यांवर पुढे राहिल असे प्रयत्न करुया – पालकमंत्री अमित देशमुख – महासंवाद
▪️ महिलांना स्मार्ट कार्ड दिले जाणार▪️ सुरक्षित प्रवास, बस मध्ये असेल एक महिला कर्मचारी▪️ महानगरपालिका हद्दीत सेवा पुरविली जाईल लातूर दि.18 ( जिमाका ) लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरविणारी देशातली पाहिली महानगरपालिका ठरली असून महिलांना अत्यंत सुरक्षित सेवा देणारी ही योजना अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. लातूर...
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला दहा कोटीचा निधी देणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  उदय सामंत – महासंवाद
मुलींचे वसतिगृह आणि इनोवेशन (innovation) सेंटरचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार सातारा दि. 1 :  कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोवेशन (innovation) केंद्रासाठी 5 कोटी रूपये असे एकूण 10 कोटी रुपये देणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि...
२०.७९ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई, दि. 15 : 20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीड, वय-36 यांना बुधवार दि.15 जून रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ,...
शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 13 – मुंबई परिसरातील पुनर्विकासाच्या कामांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्यासाठी शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शासनाने विविध सवलती दिल्याने बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन त्यांनी...
खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : खडीक्रशर व दगडखाणपट्टयाचा विषय राष्ट्रीय हरित लवादाच्या क्षेत्रात असून, न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण अनुमती शिवाय कोणत्याही प्रकारचे उत्खनन करू नये, अशा प्रकारे देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करून...
खरिपासाठी राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही
खरीप हंगाम 2022 मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे बियाणांच्या 1.71 कोटी पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे 98 टक्के क्षेत्र असून, बीटी कापसाच्या बियाणांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण 34.5 लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. याचाच अर्थ चालू वर्षी कापूस, सोयाबीन बियाणांचा कोणत्याही प्रकारचा...
कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे – कृषीमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
कोल्हापूर, दि.17(जिमाका): कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी...
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार
मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर...
डिजिटल कारभाराद्वारे आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान
मुंबई, दि. 15 (रानिआ) : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करु, असा विश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला. विविध जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे 16 हजार महिला सदस्य...
शास्त्रीय संगीत प्रसारासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
पुणे दि.९- भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत करण्यात येईल आणि सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महोत्सव घेण्यात येईल, अशी ग्वाही  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते आज गणेश कला क्रीडा मंच येथे भारतरत्न पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या  संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. श्रीनिवास जोशी, पं.सारंगधर साठे, पं.प्रमोद गायकवाड, विदुषी सानिया...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे संचालक समीर उन्हाळे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि.7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालक समीर उन्हाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. 8 व शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)ची अंमलबजावणी...
मुंबई, दि. 10 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी...
नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 1 : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना बैठकीत...
विधवा प्रथेचे निर्मूलन करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा सार्थ अभिमान – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि, 18 : विधवा प्रथेचे निर्मूलन करणाऱ्या ‘हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा राज्याची महिला व बाल विकास मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो. समाजात प्रचलित अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी यापुढे हा ठराव राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत मांडला जाण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहे. यामुळे राज्यातील महिलांचा या अनिष्ट व जाचक बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार समाजामध्ये रुजविणे ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली दि. 15 (जि.मा.का.) : संयुक्त महाराष्ट्राचा कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाजाला जागृत करुन विकासाकडे नेले. ज्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडविला अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार समाजामध्ये रुजविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती मिरज यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार 2022 बालगंधर्व नाट्यगृह मिरज...
घरकुलांची अपूर्ण कामे स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. ५ : विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील घरकुलांची अपूर्ण कामे १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा परिषद प्रशासनांतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सौरभ कटियार...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp