नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार

- Advertisement -


 नाशिकदि. १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक जिल्ह्यातील वीर सैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी वीर प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वीर जवानांना आदरांजली वाहतत्यांच्या त्यागाचे स्मरण कायमस्वरूपी राहावेया हेतूने हे प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात नाशिक जिल्हा सैनिक कल्याण विभागांतर्गत वीर नारी श्रीमती उषा संतोष डामसे आणि श्रीमती नीता सदाशिव म्हसकर यांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. वीर सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर झालेल्या या उपक्रमामुळे शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करतनव्या पिढीसमोर देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी म्हटले आहेत.

00000



Source link

- Advertisement -