पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ७२.५९ टक्के मतदान – महासंवाद

    - Advertisement -

    चंद्रपूर, दि. २३ : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात ७२.५९ टक्के मतदान झाले.

    शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ४१९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३२ हजार २६२ मतदार असून, पुरुष मतदारांची संख्या २० हजार ९०५, तर महिला मतदारांची संख्या ११ हजार ३५७ आहे.

    जिल्ह्यातील ५८ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत १५ हजार ८४२ पुरुष मतदारांनी (७५.७८ टक्के), तर ७ हजार ५७७ महिला मतदारांनी (६६.७२ टक्के) मतदान केले. जिल्ह्यात एकूण ७२.५९ टक्के मतदानाची नोंद झाली.

    ०००००००००

    - Advertisement -