महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील – परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक  – महासंवाद

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील – परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक  – महासंवाद
- Advertisement -

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील – परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक  – महासंवाद

मुंबई दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार/ परीक्षार्थींना लॉगिन करुन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

- Advertisement -