मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र सागरी व भूजल मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली.
बैठकीत सागरी आणि भूजल मच्छीमारांसाठी दोन स्वतंत्र कल्याणकारी महामंडळांची स्थापना, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती, निधीची उपलब्धता तसेच महामंडळांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, महामंडळाच्या कार्यालयासाठी महानंदच्या जागेवर कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावही बैठकीत सादर करण्यात आला. मच्छीमारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव, सहआयुक्त (सागरी), सहआयुक्त (भूजल) तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
मोहिनी राणे/स.सं






















WhatsApp