
मुंबई, दि. २६ : लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर, २०२६) रात्री आगमन झाले.
याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, राजशिष्टाचार विभागाच्या सहसचिव रोहिणी जाधव, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे उपस्थित होते.
००००
संदीप आंबेकर/स.सं
- Advertisement -

WhatsApp