
- भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. २२ : भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविले पाहिजेत. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार राज्यामध्ये २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, ९१, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथे संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२१२१२, २४९२२६१८, संकेतस्थळ https://acb.maharashtra.gov.in, ई-मेल [email protected], [email protected] आणि व्हॉट्सॲप क्रमांक ८८२८२४१०६४ यांवर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे.
०००
निलेश तायडे/विसंअ

WhatsApp