‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बदलत्या काळाच्या गरजांनुसार महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील सुधारणा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी या मुलाखतीतून दिली आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार, २६ ते गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. निवेदिका पूनम चांदोरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

    Twitter : MahaDGIPR

    Facebook : MahaDGIPR

    YouTube : MaharashtraDGIPR

    राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रमात करण्यात येणाऱ्या सुधारणा, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी राबविण्यात येणारे ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान, विद्यार्थ्यांचे आरोग्य, पारदर्शक शिक्षक भरती प्रक्रिया, ऑनलाइन प्रवेश व्यवस्था, सीएमश्री आदर्श शाळा, शाळा गुणवत्ता आश्वासन व मूल्यांकन आराखडा, विज्ञानविषयक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर या मुलाखतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

    या मुलाखतीतून शालेय शिक्षणातील सुधारणा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी यांविषयी माहिती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि संस्कार यांचा समतोल साधून त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे, शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व पालकांचा सहभाग वाढविणे आणि शाळांच्या गुणवत्तावृद्धीसाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांवरही प्रधान सचिव देओल यांनी प्रकाश टाकला आहे.

    ००००

    जयश्री कोल्हे/ससं

    - Advertisement -